- निवडणुका झाल्या पण निकालाचे काय..?
चंद्रपूर-(नरेंद्र सोनारकर):२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या पालिका आणी नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी येणे अपेक्षीत होते.मात्र सुप्रीम कोर्टाने हा निकाल २१ जानेवारी २०२६ पर्यंत सुरक्षित ठेवल्याने निवडणुकीला समोरे गेलेल्या राजकीय पक्ष व हजारो अपक्ष उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.दरम्यान आरक्षणाची सिमा ओलांडलेल्या पालिकांचे काय करायचे?संविधानाची चौकट ओलांडून ५० टक्क्याहून अधिक झालेल्या आरक्षणाला सद्यस्थितीत कायम ठेऊन निवडणुकीचे निकाल देता येतील का?कुठल्या कारणाने रद्द करण्यात आलेल्या निवडणुकांसाठी काय करायचे?वाढीव आरक्षणावरील जनहीत याचिका कर्त्याच्या न्यायसंगत बाजूंचा विचार बघता २१ जानेवारीला सर्वच्या सर्व गुंता कोर्टाला एकाच वेळी सोडवता येईल का? असले अनेक प्रश्न एकाच वेळी उपस्थित झाल्याने राज्यात २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल २१ जानेवारीला येईलच,हे निश्चितपणे सांगता येऊ शकत नसल्याचे विधीतज्ञांचे मत आहे.
राज्यात आरक्षणाची सीमा ओलांडलेल्या नगर पंचायती व नगर पलीकांच्या निवडणुकीला कोर्टाने परवानगी दिली असली तरी “निकाल मात्र आम्ही राखून ठेऊ” असे सूचक विधान कोर्टाने केले होते.तरीही या विधानाचे गांभीर्य लक्षात न घेता राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबर रोजी निवडणुका घेतल्या.लोकशाहीच्या बळकटीसाठी निवडणुका आवश्यक असल्या तरी सोमोर डोंगराएवढे कायदेशीर धोके दिसत असतांना आयोगाने सबुरीने घ्यायला हरकत नव्हती.मात्र निवडणुका लादल्या गेल्या.करोडो रुपयांचा चुराडा झाला.उमेदवारांनी जीवाचे रान केले.पैसा,प्रतिष्ठा,कष्ट,वेळ पणाला लावून निवडणूक लढवली.आणी या निकालांवरच जर अनेक प्रश्नांची धूळ जमली असेल तर निवडणुकीला समोरे गेलेल्या प्रत्येक उमेदवाराची धाकधुक वाढने क्रमप्रात आहे.
दरम्यान निकालाच्या प्रतीक्षेत उमेदवारांची झोप उडवणाऱ्या या निवडणुकांचे सुप्रीम निकाल २१ जानेवारी २०२६ रोजीच लागावेत,तूर्तास ही आशा ठेवण्याशिवाय कुणाकडेही कुठलाच पर्याय नाही…मात्र
२४६ नगर पालिका ४२ नगर पंचायत पैकी ४० नगर पालिका आणी १७ नगर पंचायतीनी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या मुळे राज्यातील ६ हजार ८५९ सदस्य तथा २८८. अध्यक्षांच्या निवडणूक निकालानांवर अध्याप टांगती तलवार असणार आहे,हे विशेष!



