महापालिका निवडणुकांचे १४ डिसेंबर रोजी बिगुल वाजणार?

0
56
  1. महापालिका निवडणुकांचे १४ डिसेंबर रोजी बिगुल वाजणार?
  2. कॉलेज कट्टा ब्युरो-
    २ डिसेंबर रोजी अनेक आरोप प्रत्यारोपांच्या घाई गर्दीत राज्यातील पालिका निवडणूक पार पडल्या.या निवडणुकीतील विजयी उमेदवार जाहीर करण्याचा कोर्टाने २१ डिसेंबर चा मुहूर्त काढला असून,काही कारणाने रद्दबातल ठरविण्यात आलेल्या राज्यातील निवडणुका अध्याप व्हायच्या आहेत.या निकालावर कोर्टाची अध्यापही टांगती तलवार असल्याने निवडणूक आयोग आणी कोर्ट वेळेवर काय भूमिका घेतील,याची वाट बघण्याशिवाय कुणाकडे कुठला पर्याय नाही.याच धामधूमीत निवडणूक आयोगाने राज्यातील २९ आयुक्तांची बैठक घेतल्याने राज्यातील महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
    निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिका आयुक्तांची आज बैठक बोलावली असून, हिवाळी अधिवेशन संपल्या नंतर १४ डिसेंबरला त्याच दिवशी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर आणि अहिल्यानगरसह प्रलंबित असलेल्या महापालिकांची यादीही समोर आली आहे. या घडामोडींमुळे निवडणूक प्रक्रियेला वेग येणार असल्याचे म्हटले असले तरी राज्यातील महापालिका निवडणुका १४ डिसेंबर ला होतील की नाही,यावर मात्र प्रश्न चिन्ह लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here