हिंगणा प्रतिनिधी-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, बौध्द हक्क परीषद हिंगणा येथे बसपा चे हिंगणा विधानसभा मा. अध्यक्ष- महेश वासनिक तथा विश्वशांती बौध्द विहार वेणावन येथे बौध्द समाज एकता परीषदेचे अध्यक्ष- सुरेश मानवटकर यांच्या उपस्थितीत मानवंदनेने अभिवादन करण्यात आले* प्रसंगी श्रावण गोसावी, बंडू वानखेडे, प्रमोद डुले, लोकेश काटोले, सतिश सोमकुवर, जगदीश झिल्पे, निलवर्धन वासनिक, भिमराव फुलझेले, अनिल नगराळे, बबन फुलझेले, प्रथमेश नगराळे, प्रकाश मानवटकर, कुमार मेश्राम, सफी शेठे, जावेद महाजन, मनोज पवार, उज्वला पुनवटकर, सुवर्णा वासनिक, विमल पुनवटकर, प्रियतमा गणविर यासह तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी बहुसंख्येने महिला, मुले व नागरिक यांनी उपस्थित राहून महामानवाला मानवंदनेने श्रद्धांजली अर्पण करुण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वव्यापी विचार अंगीकृत करुन त्याचा निरंतर प्रचार करण्याचा संकल्प करण्यात आला.




