कॉलेज कट्टा- नागपूर:आजपासून उपराजधानीत सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाला अद्याप विरोधी पक्ष नेतेपद न मिळाल्याने हेअधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांशिवाय पार पडणार का?असा प्रश्न उपस्थित झाला असतांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणं या मुद्द्यावरुन विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणं हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, असा घणाघात या नेत्यांनी केला असला तरी दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्या शिवाय हे हिवाळी अधिवेशन चालणार का? असा प्रश्न उपस्थित झाला असून शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा मुद्दा असो की गाजत असलेला शिक्षक भरती घोटाळा असो या वर विरोधी पक्षातील आमदारांची महत्वाची भूमिका असेल. या अधिवेशनात सत्ताधारी काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
या सात दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील जनतेला विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना, तसंच मोठ्या अपेक्षा आहेत.मुंबई- पुणे साठी चंद्रपूरातून थेट रेल्वेगाड्यांची सुविधा करा,जिल्ह्यात झालेला शिक्षक भरती घोटाळ्याचा मुद्दा एरणीवर आला असतांना येथील आमदार,शिक्षक आमदार काय भूमिका घेतात,याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवरती पडणार का?, पुरवणी मागण्यासंदर्भात काही नवीन घोषणा होते का? हे पाहणं महत्वाचं राहील.




