IAS तुकाराम मुंढेवर खोटी कार्यवाही केल्यास जनता रस्त्यावर उतरेल…

0
272

तुकाराम मुंढे वर खोटी कार्यवाही केल्यास जनता रस्त्यावर उतरेल…

कॉलेज कट्टा न्यूज नागपूर-
IAS तुकाराम मुंढे यांच्या अटक आणी निलंबणाची मागणी सभागृहात करणारे नागपूर भाजप चे आ.कृष्णा खोपडे यांनी बिनबुडाच्या आरोपाचा उच्चांक गाठला आहे.म्हणे “IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या भ्रष्ट कारभारा विरुद्ध आवाज उठविल्या मुळे त्यांच्या समर्थकांकडून आपल्याला धमकी देण्यात आलीय त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे” आमदार खोपडेनी अशा आशयाची तक्रार पोलिस स्टेशन व मुख्यमंत्र्यांना करून राज्यात खळबल उडवली आहे.

काय आहे मुढेंवर आरोप..?
*तुकाराम मुंढे हे कोरोना काळात नागपूर महानगर पालिकेत रुजू असतांना त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गैरप्रकार करत त्यांच्याकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतांनाही त्यांनी पद्धतीने एका कंत्राटदाराला २० कोटी रुपयांचा धनादेश दिला होता,असा आ.कृष्णा खोपडे यांचा आरोप आहे.

का झाल्यात २० वर्षात २४ बदल्या..?
*अलीकडे मुंबईत दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत.त्यांचे शिस्तब्द्ध नियोजन,जनहितार्त काम करण्याचा मानस आणी त्यासाठी जोपसावी लागणारी कठोरता,नियमबाह्य कामांना थारा न देता ते कायदा आणी नियमांच्या चौकटीत राहून काम करतात.त्यामुळे नेतेमंडळी,दलाल,ठेकेदार आणी त्याच प्रशासनात ‘पायचाटू’ सेवा देणाऱ्या. अधिकाऱ्यांना ते हजम होत नाही.परिणामी त्यांची वर्षा पूर्वीच बदली ठरलेली असते.भ्रष्ट्राचाराने बरबटलेल्या या घाण व्यवस्थेत एक इमानदार माणूस खपवून घेतला जाऊ शकत नाही.म्हणूनच २० वर्षाच्या कार्यकाळात त्यांना २४ बदल्यांना समोरे जावे लागले…

तर जनता निश्चितपणे रस्त्यावर उतरेल…
*आपल्या स्वाभिमान आणी इमानदारी साठी प्रसिद्ध असलेले मुंबईचे तत्कालीन अधिकारी गो.रा. खैरणार यांच्या नंतर तुकाराम मुंढे यांनी एक अधिकारी जनतेच्या हितार्थ काय करू शकतो,हे आपल्या सेवेतून दाखवून दिले आहे.त्यामुळं शासन प्रशासनातील भ्रष्ट नेते आणी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कितीही बदल्या केल्या तरी प्रत्येक ठिकाणी त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला आहे.सामान्य नागरिक मुंढे साहेबांसोबत आहे.मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी तुकाराम मुंढे यांना खोट्या आरोपात गोवून अटक केल्यास राज्यातील जनता रस्त्यावर उतरून जाब विचारल्या शिवाय राहणार नाही असे जाणकारांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here