मतदारांचे आभार माणून मला कर्तव्यातून मुक्त व्हायचे नाहीय…- गोलू उर्फ सुमित डोहणे

0
90

 

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर- राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेतृत्व राकेश सोमाणी यांचे मार्गदर्शन आणी अमूल्य साथ, समाजिक कार्यातील सातत्य,सर्वसामान्यांशी जोडल्या गेलेली नाळ आणी विजया नंतरचा कृतिशील आराखडा… यामुळे मतदारांनी मला भरभरून मतदानान करत 962 मतांची भारी लीड देत 1716 अशा सर्वाधिक मताने या ऐतिहासिक विजया साठी जनतेचे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत…आम्ही शून्यातून तयारी करून तीन उमेदवारांच्या विजया सह बल्लारपूर शहरातून आपचा राजकीय प्रवास सुरु केला असून जनतेच्या ऋणात राहून शक्य होईल तेवढे कार्य करण्याचा प्रयत्न करू,असे भावोद्गार् प्रभाग करा.10 मधून भरघोस मताने विजयी झालेले उमेदवार गोलू डोहणे यांनी कॉलेज कट्टा शी बोलतांना व्यक्त केले आहे.

मला जनतेचे आभार मानून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचे नाही,तर त्यांनी माझ्यावर व माझ्या सहकाऱ्यांवर दाखविलेल्या विश्वासावर खरे उतरण्याचा प्रयत्न करून् जनतेचे अमूल्य प्रेम आणी अनमोल ऋण फेडण्याचा नियमित प्रयत्न करणार असल्याचे भावनिक मतही उमेदवार गोलू उर्फ सुमित डोहणे यांनी कॉलेज कट्टाशी बोलतांना व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here