कॉलेज कट्टा न्यूज
नागपूर-राज्यात मनपा निवडणुकीत तिकिट वाटप करतांना सर्वच राजकीय पक्षांना तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसत असतांना भाजपची उमेदवारी न मिळालेल्या पक्षाच्या निष्ठावन्तानी अनेक ठिकाणी मोठा राडा केल्याची माहिती आहे.याचं पार्श्वभूमीवर नागपुरात बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. यात आजी-माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती यांच्यासह एकूण 56 नगरसेवकांची तिकिटे कापून भाजपने धक्कातंत्र वापरले आहे…यामुळे पक्षात मोठा असंतोष उफाळून आला आहे. यापैकी 2 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधले तर काही इच्छुकांनी दावेदारी दाखल करून भाजपला आव्हान दिले आहे.
दोन दिवसांपासून उमेदवारीसाठी भाजपकडे इच्छुकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. असंतोष टाळण्यासाठी भाजपने उमेदवाराला बोलावून एबी फॉर्मचे वाटप केले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून ही सर्व प्रक्रिया सोमवारपासून सुरू केली होती. मंगळवारी दुपारी तीन वाजता सर्व उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर भाजपचे शिवसेनेला सोडलेल्या आठ जागांसह सर्वांची नावे जाहीर केली. भाजपने 151 पैकी 143 जागेवर उमेदवार उभे केले आहेत.
शिवसेनेच्या कोट्यातील सहा जागेवरसुद्धा भाजपने एका माजी नगरसेविकेसह आपल्या कार्यकर्त्यांची नावे टाकली आहेत. तिकिटे कापण्यात आलेल्या प्रमुख नगरसेवकांमध्ये माजी सभापती अविनाश ठाकरे, सुधार प्रन्यासचे विश्वस्त संजय बंगाले, माजी महापौर नंदा जिचकार, माजी सभापती प्रवीण भिसीकर, अर्चना पाठक, हरीश ग्वालवंशी, अमर बागडे, परिणिता फुके, शिल्पा धोटे, प्रमोद कौरोती, उज्ज्वला शर्मा, लता काडघाये, सुमेधा देशपांडे, नेहा वाघमारे, सरला नायक
माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, यशस्वी नंदनवार, ज्योती भिसिकर, राजेश घोडपागे, वंदना यंगटवार, श्रद्धा पाठक, मनीष धावडे, अनिल गेंड्रे, जयश्री रारोकर, वैशाली रोहणकर, मनीषा कोठे, समिधा चकोले, वंदना भुरे, रेखा साकोरे, हरीश दिकोंडवार, स्वाती आखतकर, नीता मुळे, शीतल कांबळे, उषा पॅलेट, दीपक चौधरी, अभय गोठेकर, वंदना भगत, माधुरी ठाकरे, राजेंद्र सोनकुसरे, जयश्री वाडीभस्मे, माजी सभापती प्रकाश भोयर, लहुकुमार बेहते, सोनाली कडू, प्रमोद तभाने आदींचा समावेश आहे.आता हे माजी नगर सेवक भाजपला तरतात की बंडखोरी करत स्वस्तित्वाची लढाई लढतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




