कोण होईल बल्लारपूरचा नगराध्यक्ष..? आज फैसला….

0
78

 

कॉलेज कट्टा-
बल्लारपूर- जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका म्हणून ख्याती असलेल्या,विविध जाती धर्म,पंथ,भाषा यांचा संगम असलेल्या नागरिकांची ही बल्लारपूर पालिका आहे.2 डिसेंबर पासून आज 21 डिसेंबर पर्यंत निकालाची वाट बघणाऱ्या नगराध्यक्ष आणी नगर सेवकांच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होणार आहे…

नगराध्यक्ष पदासाठी खरी लढत शिवसेना (उबाठा)उमेदवार चैताली मुलचंदानी आणी काँग्रेसच्या अल्का वाढई यांच्यातच झाली असून भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत असले तरी भाजपा च्या रेणुका दुधे याच नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकतील असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांना आहे…दरम्यान, या निवडणुकीत ओबीसी महिला राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी ८ महिलांनी आपले नशीब आजमावले आहे. तसेच ३४ नगरसेवक पदांसाठी १९२ उमेदवार रिंगणात होते. एकूण मतदानाची एकूण टक्केवारी ५५.३६ टक्के इतकी झाली आहे.

एकंदरीत सारेच दावे,प्रतिदावे,भाकीते आणी शक्यता आज निकाली निघणार असून,कुणाच्या गोटात आनंद तर कोणाच्या गोटात दुखांचे सावट राहणार असे असले तरी बल्लारपूरात कायदा सुव्यवस्था आबाधित राहील,यात संशय नाही.कॉलेज कट्टा टीम कडून प्रत्येक विजयी उमेदवारांचे अभिनंदन…पराभूत उमेदवारांना पुढल्या निवडणुकीसाठी सदिच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here