प्रभाग क्र.14 मधून गणेश बहुरिया यांना उमेदवारी नाकारल्याने भाजप चा दुर्दैवी पराभव…

0
59

 

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर- गणेश बहुरिया यांची हेतू पुरस्पर उमरदवारी नाकारून काँग्रेसाला बळ देण्याचा बेशरम पणा पक्षाने आपल्या सोबतच नव्हे शहरात उमेदवारी देतांना अनेका सोबत केला आहे, एका विशिष्ट व्यक्तीना उमेदवारी देतांना शाहनिशा न करता फक्त आपला न्यूँनगंड लपविण्यासाठी आणी पाया पडून उदो उदो करणाऱ्या भक्तांना खुश करण्यासाठी उमेदवारीची रेवडी वाटल्यानेच भाजपचा दारून पराभव झाल्याची प्रतिक्रिया समाजिक कार्यकर्ते देवेंद्र कुरील,अपक्ष उमेदवार गणेश बहुरिया यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वरिष् नेतृत्व समजल्या जाणाऱ्यांनी संधीसाधू पणा करत फक्त आपल्या पायाची पायधूळ माथी लावणाऱ्या,त्यांच्या प्रत्येक कामात होकारार्थी मान हलवणाऱ्यांनाच उमेदवारी दिल्याने आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांची यांनी प्रेत यात्रा काढल्याचे मत् व्यक्त करत भाजपा घराणे शाही विरुद्ध असतांना एकाच कुटुंबातील तीन जणांना पक्षाची उमेदवारी का देण्यात आली? असा सवाल उपस्थित करत स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी रचलेल्या कट कारस्थानाची चौकशी पक्षाने करावी,अशी मागणी समाजिक कार्यकार्ते देवाभाऊ कुरील,प्रभाग 14 चे अपक्ष उमेदवार गणेश बहुरिया यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here